चंद्र आणि चंद्रयान -३( भाग -२)

पहिल्या भागामध्ये आपण चंद्राबद्दलच्या काही फॅक्चुयल आणि कन्सेप्च्युअल गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.या भागामध्ये आपण मानवाने चंद्राला व अंतरिक्षाला जाणून घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल चर्चा करू.
                      माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळा बनवणारा एक घटक म्हणजे त्याची जिज्ञासू वृत्ती . माणूस प्राचीन काळापासून त्याच्या आसपास घडणाऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक राहिलेला आहे .याचाच एक भाग म्हणजे माणसाने पृथ्वी सोडून इतर ग्रह आणि उपग्रह यांना जाणून घेण्यासाठी केलेले प्रयत्न. प्राचीन काळामध्ये असं समजलं जायचं की पृथ्वी एका जागेवर स्थिर आहे आणि सूर्य तिच्याभोवती फिरतो. पण हा समज खोटा आहे आणि सूर्य नव्हे तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सांगण्याचे काम १५ व्या शतकात निकोलस कोपर्निकस याने केले. पण इथे चकित करणारी गोष्ट अशी की कोपर्निकसच्या अगोदर ,जवळपास पाचव्या शतकामध्ये एका व्यक्तीने पृथ्वी गोल आहे, ती स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, ती सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते एवढेच नाही तर एक दिवस हा जवळपास २३ तास ५६ मिनिट आणि ४ सेकंद एवढा असतो हे सांगण्याचं काम भारतामध्ये आर्यभट्ट या खगोलशास्त्रज्ञाने केलेले होते. (आर्यभट्ट)
यानंतर अनेक खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या बाहेरील जे अंतराळ आहे त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सन १६०९ मध्ये गॅलिलिओ या भौतिक शास्त्रज्ञाने एक टेलिस्कोप तयार केला ,त्या टेलिस्कोपद्वारे त्याने पृथ्वीच्या  जवळ असणाऱ्या चंद्राला बघितलं आणि चंद्राच्या पृष्ठभागावर अनेक मोठे  खड्डे आणि डोंगर आहेत म्हणजे चंद्राचा पृष्ठभाग मऊ नसुन तो ओबडधोबड आहे हे सांगितलं त्याचबरोबर त्याने गुरु ग्रहाचे चार मोठे उपग्रह पाहिले आणि शनी ग्रहाला त्याच्या सभोवताली रिंग आहे हे पण पाहिले. (इथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे की पहिला टेलिस्कोप हा १६०९ मध्ये नव्हे तर १६०८ मध्ये म्हणजेच गॅलिलिओ च्या आधी Hans lippershey यांनी बनवलं होतं.) इथून पुढे जवळपास 200 ते 250 वर्ष अंतरिक्षेचा अभ्यास हा दुर्बिणीपर्यंतच मर्यादित राहिला.(गॅलिलिओ)
       अंतरिक्ष अभ्यासामध्ये खरी प्रगती झाली ती म्हणजे विसाव्या शतकामध्ये खास करून दुसऱ्या विश्व युद्धानंतर (१९४५नंतर) जेव्हा शीतयुद्ध सुरू झाले. याकाळात अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी स्वतः ला दुसऱ्यापेक्षा वरचढ दाखवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये दुसऱ्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न अंतरिक्ष क्षेत्रात पण झाला. रशियाने ४ ऑक्टोबर 1957 रोजी sputnik-1 नावाचा  जगातील पहिला उपग्रह अंतरिक्षेत्रामध्ये सोडला.
( स्पुटनिक-१)
 पुढे 12 एप्रिल 1961 रोजी जगातील पहिला माणूस जो अंतरिक्षामध्ये गेला तोही रशियानेच पाठवला आणि तो होता युरी गागारीन त्यानंतर 1963 मध्ये व्हॅलेंटिना टेरेशकोव्हा गोवा ही जगातील पहिली अंतरिक्षामध्ये जाणारी महिला ठरली जी की रशियनच होती. पण माणसाला अंतरिक्षामध्ये पाठवण्या अगोदर एखादे अंतराळयान किती सुरक्षित आहे आणि तिथले वातावरण कसं आहे हे पाहण्यासाठी प्राण्यांचा वापर केला गेला .अमेरिकेने १९४९ मध्ये अल्बर्ट-११ या नावाचे माकड अंतरिक्षामध्ये पाठवले परंतु लॅडिंग च्या वेळेस त्याचा मृत्यू झाला. रशियाने १९५७ मध्ये लैका नावाचा कुत्रा अंतरिक्षामध्ये पाठवला त्याचाही अंतराळयानातच उष्णता वाढल्यामुळे मृत्यू झाला.
(व्हॅलेंटिना टेरेशकोव्हा)
(अल्बर्ट ११)
(लैका)
१९६१ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी घोषणा केली की या दशकामध्ये अमेरिका चंद्रावरती उतरेल. आणि जुलै १९६९ मध्ये अपोलो-११ या मिशन अंतर्गत अमेरिकेने चंद्रावरती उतरवण्याचा दावा केला त्याच्यानुसार नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावरती उतरणारा पहिला आणि त्यानंतर बझ अल्ड्रीन दुसरा माणूस ठरला बनला. हे सोडून अमेरिकेने व रशियाने चंद्राचा अभ्यास करण्यासाठी व स्वतः ला दुसऱ्यापेक्षा वरचढ दाखवण्यासाठी अनेक उपग्रह व अंतराळयान सोडले परंतु १९७५ नंतर त्यांच्यामधील अंतरिक्षासंबंधी स्पर्धा कमी झाली.
            आपल्या देशाने सुद्धा स्वातंत्र्यानंतर काही वर्षाने अंतरिक्षेत्रामध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला .भारताला अंतरिक्ष क्षेत्रात पुढे नेण्याचे काम डॉक्टर विक्रम साराभाई यांनी केलं त्यामुळे त्यांना "फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम" असं म्हटलं जातं. विक्रम साराभाई यांनी ज्यावेळेस रशियाचा स्पुटनिक-१ हा उपग्रह अंतरिक्ष मध्ये गेला तेव्हा अंतरिक्ष क्षेत्राचे महत्त्व ओळखले होते. (विक्रम साराभाई)
त्यानंतर त्यावेळेसचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी  देशाच्या भविष्यासाठी वैज्ञानिक कामगिरी खूप महत्त्वाची आहे हे ओळखून १९६१ मध्ये अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत अंतरिक्ष संशोधनाला प्राधान्य दिले पुढे  होमी भाभा ज्यांना "फादर ऑफ इंडियाज ऑटोमिक प्रोग्राम" असं म्हटलं जातं यांनी INCOSPAR म्हणजेच इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च उभारलं आणि विक्रम साराभाई यांना त्याचं अध्यक्ष बनवले. 1962 मध्ये थुंबा येते रॉकेट लॉन्चिंग स्टेशन ची निर्मिती करण्यात आली आणि त्याच वर्षी साउंडिंग रॉकेट चा यशस्वी प्रयोग पार पडला.
(आर्यभट्ट उपग्रह)
( रोहिणी उपग्रह)
 पुढे 1969 रोजी इस्रोची (ISRO) निर्मिती झाली .1975 मध्ये भारताने आर्यभट्ट नावाचा पहिला उपग्रह बनवला पण त्यावेळेस आपल्याकडे तो उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात साठी लागणारे रॉकेट नव्हते म्हणून रशियाच्या मदतीने तो आपण अवकाशात सोडला .पुढे इसरो ने उपग्रह अवकाशात नेण्याजोगे किंवा नेण्याची कुवत असणारे रॉकेट बनवण्याचा प्रयत्न केला .त्यामुळेच1979 मध्ये एस एल व्ही( सॅटॅलाइट लॉन्चिंग व्हेईकल) तयार झाले आणि त्याच वर्षी श्रीहरीकोटा येथे दुसरे रॉकेट लॉन्चिंग स्टेशन बनवण्यात आले .त्यानंतर 1980 मध्ये इसरोने रोहिणी नावाचा उपग्रह बनवला आणि तो स्वतः पृथ्वीच्या कक्षेत पाठवला. त्यानंतर पुढे जास्त ताकदीचे रॉकेट बनवण्याचा प्रयत्न केला त्यानुसार 1994 ला पीएसएलव्ही आणि 2001 ला जीएसएलव्ही रॉकेट बनवले जे की कोणताही उपग्रह आणि कितीही लांब पाठवण्याची क्षमता ठेवत होते. 2008 मध्ये इसरो ने चंद्रयान -१ नावाचं मिशन लॉन्च केलं त्याद्वारे उपग्रह चंद्राच्या कक्षेमध्ये पाठवून त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यशही आलो चंद्रयान-१ने सर्वात महत्त्वाचा शोध केला तो म्हणजे चंद्राच्या मातीमध्ये पाण्याची अंश शोधले . इस्त्रोने 5 नोव्हेंबर 2013 रोजी चंद्राच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला म्हणजेच  मंगळाचा अभ्यास करण्यासाठी मंगलयान पाठवलं आणि यानुसार भारत जगातला मंगळाकडे जाणारा चौथा देश बनला. 22 जुलै 2019 मध्ये इस्त्रोने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यासाठी चंद्रयान -२ पाठवले पण काही कारणामुळे ते यशस्वी ठरले नाही. 
(चंद्र यान-३)
परंतु इस्रो येथे थांबले नाही ,14 जुलै 2023रोजी इस्त्रोने अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी  चंद्रयान-३ चंद्राकडे पाठवलं त्याच्यासोबत विक्रम नावाचे लॅंडर आणि प्रग्यान नावाचे रोव्हर पण पाठवलं जे चंद्रावरती उतरेल आणि त्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास करेल. 23 ऑगस्ट 2023  रोजी चंद्रयान -३ यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले .इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की चंद्रयान तीन हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरले जिथे अगोदर कुठलाही देश उतरला नव्हता .याच कारण आहे दक्षिण ध्रुवावरचा भाग आणि वातावरण.दक्षिण ध्रुवावरती खूप मोठे खड्डे असल्यामुळे तिथला पृष्ठभाग खूप ओबडतोब आहे त्याचबरोबर दक्षिण ध्रुव जास्त काळासाठी अंधारामध्ये राहते म्हणजेच तिथं तापमान खूप कमी असते अशा तापमानामध्ये अंतराळयानाची अनेक यंत्र काम करत नाहीत आणि त्यामुळेच आज पर्यंत कोणत्याही देशाने तिथं अंतराळयान उतरवण्याचा प्रयत्न केला नव्हता परंतु हीच अशक्य अशी गोष्ट इस्त्रोने करून दाखवली आणि आपल्या देशाचे नाव जगभरात गाजवले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेतू....

चंद्र आणि चंद्रयान ३ (भाग-१)