हेतू....
सध्याचे युग (२१वं शतक) हे स्पर्धेचे युग मानले जाते.आपण आपल्या आसपास बघितले किंवा स्वतःला जरी बारकाईने बघितले तरी हि गोष्ट आपल्याला समजून येते.आज प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात आपल्याला स्पर्धा बघायला मिळते. प्रत्येक जण दुसऱ्या पेक्षा कसं काहितरी चांगलं/ वरचढ करता येईल याच्या मागे लागला आहे. खरंतर दुसऱ्या पेक्षा चांगले करण्यात किंवा स्पर्धा करण्यात काही चुकीचपण नाही. परंतु या सर्व प्रवासात आपण दुसऱ्याला सोडाच पण स्वतःलाही पुरेसा वेळ देत नाही, आपण आपल्या इच्छा, आपली समाजाप्रती, निसर्गाप्रती असलेली कर्तव्ये विसरून जातोय . आणि यामुळेच आपण आपल्या आयुष्यात समाधान, आनंद या गोष्टींपासून वंचित राहतो. या सर्व गोष्टी आपण सगळीकडे पाहत, अनुभवत आहोत. मग याला उपाय काय? आनंदी ,समाधानपुर्वक आयुष्य कसे जगावे ?.असा विचार अनेकदा माझ्या मनात येत होता. मग अनेकदा असे वाटायचे की स्पर्धेच्या युगात स्पर्धा सोडून देणे हा मुर्खपणा ठरेल, त्यामुळे स्पर्धेतुन बाहेर पडणे हा तर उपाय होऊ शकत नाही. मग काय करायचे तर प्रत्य...